Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरेंना मोठा धक्का;….. म्हणून निवडणूक आयोगाकडे जमा केलेले अडीच लाख प्रतिज्ञापत्र निकामी!

0 425

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने 11 लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे शिवसैनिकांकडून जमा करत आघाडी घेतली आहे. मात्र, ठाकरेंच्या गटाने आयोगाला पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी जवळपास अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये नसल्याने निरुपयोगी ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, अडीच लाख प्रतिज्ञापत्र निकामी ठरली असली तरी देखील 8.5 लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे जमा करण्यात ठाकरे गटाला यश आले आहे.

Manganga

 

दरम्यान, आपली शिवसेना हीच खरी सेना असल्याचं सिद्ध करण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाकडून पक्षाच्या लाखो सदस्यांमार्फत पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत. ही प्रतिज्ञापत्रे जमा करण्यात ठाकरे गटाने आघाडी घेतली असली तरी ती निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये ही प्रतिज्ञापत्र नसल्याने तब्बल अडीच लाख अर्ज निरुपयोगी ठरल्याची माहिती समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.