Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, बुधवार २६ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 649

मेष:
कामावर लक्ष केन्द्रित करावे. आवडी-निवडी साठी खर्च कराल. रागावर नियंत्रण ठेवावे. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल.

 

Jawale Jewellers

वृषभ:
व्यापारात काही नवीन सुविधा कराल. आपले मानसिक आरोग्य जपावे. अति विचार करू नयेत. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल.

Manganga

 

मिथुन:
काही चांगले बदल अनुभवास येतील. आपणहून कोणत्याही गोष्टीत अडकू नका. मन प्रसन्न राहील. आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील.

 

कर्क:
घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. जुने आजार दुर्लक्षित करू नका. टीकेकडे फार लक्ष देऊ नये. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. दिवसभर आत्ममग्न राहाल.

 

सिंह:
अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत. स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस.

 

कन्या:
स्वत:साठी थोडा वेळ काढावा. आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल.

 

तूळ:
घरात सामंजस्याने वागावे लागेल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.

 

वृश्चिक:
भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल.

 

धनू:
परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. आहाराचे पथ्य न चुकता पाळा. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल.

 

मकर:
प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. काही गोष्टीत समाधान मानावे लागेल. भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल.

 

कुंभ:
गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. काही गोष्टींचे चिंतन करावे. जुगारातून लाभ संभवतो. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा.

 

मीन:
प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात. अतिघाई करू नये. घरातील वातावरण खेळकर राहील. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. कामात गोंधळ उडवून घेऊ नका.

 

Leave A Reply

Your email address will not be published.