Latest Marathi News

BREAKING NEWS

T20 World Cup : ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा सात गडी राखून केला पराभव : स्टॉयनिसची अर्धशतकी खेळी

0 57

नवी दिल्ली : आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मधील आजच्या सामान्यामध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव आपला पहिला विजय प्राप्त केला.

Jawale Jewellers

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावांचे लक्ष पूर्ण केले. फिंच आणि मार्कस स्टॉयनिस शेवटपर्यंत खेळपट्टीवर नाबाद राहिले. स्टॉयनिसने लंकन गोलंदाजीच पिसे काढत १८ चेंडूत ५९ धावा केल्या. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Manganga

सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने २६ धावांवर डेव्हिड वॉर्नरची महत्त्वाची विकेट गमावली. त्याने १० चेंडूत ११ धावा केल्या आणि महेश तीक्षानाच्या चेंडूवर शनाकाकडे झेलबाद झाला. त्यानंतर धनंजयने मिचेल मार्शला राजपक्षेकरवी झेलबाद केले. मार्शने १७ धावा केल्या. १२ चेंडूत २३ धावा करून ग्लेन मॅक्सवेल करुणारत्नेचा बळी ठरला. भंडाराने त्याचा शानदार झेल सीमारेषेवर टिपला.

तत्पूर्वी, श्रीलंकेसाठी पथुम निसांकाने ४५ चेंडूत ४० धावा केल्या. धनंजय डी सिल्वाने २६ धावा केल्या. शेवटी चरित असलंका (२५ चेंडूत ३८ धावा) आणि चमिका करुणारत्ने (सात चेंडूत १४ धावा) यांनी झटपट धावा करत संघाची धावसंख्या सहा बाद १५७ पर्यंत नेली. मार्कस स्टॉइनिस आणि मिचेल मार्श यांच्याशिवाय सर्व गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या विकेट घेतल्या.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.