Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार : भाजपकडून गोपीचंद पडळकरांची वर्णी शक्य !

0 1,754

आटपाडी : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले नंतर झालेल्या पहिल्या विस्तारामध्ये फक्त कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराकडे नाराजासहित सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या.

Jawale Jewellers

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना लवकर मंत्रीमंडळ विस्तार करणार असल्याचे सांगितल्याने या मंत्री मंडळ विस्तारामध्ये भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संभाव्य नावाची चर्चा होवू लागल्याने खानापुर मतदार संघातील भाजप कार्यकर्ते यांच्यासहित सर्वसामान्य नागरिकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

Manganga

आम. गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षाची भूमिका पार पडत अनेक मुद्यावर महाविकास आघाडी सरकारमधील विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसला सळो की पळो करून सोडले होते. महाविकास आघाडी सरकारच्या अनेक मुद्यावर घेरत त्यांनी थेट भूमिका मांडली होती. थेट टीका करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी भाजपमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे मंत्री मंडळ विस्तारामध्ये त्यांच्या नावाची चर्चा असून त्यांचा मंत्रीमंडळामध्ये समावेश झाल्यास खानापुर मतदार संघाबरोबरच आटपाडी तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून सांगली जिल्ह्यासह प.महाराष्ट्रात भाजप बळकट होण्यास मदत मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.