Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : मका पीक पाहणी कार्यक्रम संपन्न : कावेरी कंपनीच्या वाणामुळे मोठे उत्पादन

आटपाडी : "मका पिक पहाणी" कार्यक्रम संपन्न

0 143

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील विठलापुर येथे दि. ९ रोजी बियाणे कंपनीतील अग्रगण्य समजली जाणारी कावेरी सीड्स लि. व मंगलमूर्ती फळबाग व भाजीपाला संघ,आटपाडी यांच्या संयुक्त विद्यामाने “मका पिक पहाणी” कार्यक्रम संपन्न झाला.

Jawale Jewellers

विठलापुर चे प्रगतशील शेतकरी राहुल अशोक कुंभार यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष मका प्लॉट पिक पहाणी कार्यक्रम पार पडला. कावेरी कंपनीच्या KMH-3712 या वाणाचे त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले होते. त्यामुळे कंपनीच्या वतीने त्यांच्या मका प्लॉट पिकाची पहाणी करण्यात आली.

Manganga

सदर मका प्लॉट च्या प्रत्यक्ष पाहणीसाठी कावेरी कंपनीचे अधिकारी, मिलिंद पवार (ABM पश्चिम महाराष्ट्र), मंगलमूर्ती फळबाग चे चेअरमन पंढरीनाथ (नाना) नागणे, हणमंत बिरादार (TSL सांगली), विठ्ठल बाड (सरपंच), स्वप्निल बाड, रविंद्र घूटूकडे (कृषी सहाय्यक), विजय रणदिवे (कृषी सहाय्यक), विजय यादव, प्रवीण जावीर, व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.