Latest Marathi News

BREAKING NEWS

सावधान! ‘या’ ब्रँडच्या शॅम्पूमुळे रक्ताच्या कर्करोगाचा धोका!

0 721

नवी दिल्ली: युनिलिव्हर या सुप्रसिद्ध कंपनीच्या अनेक ब्रँडच्या शाम्पूमध्ये कॅन्सर निर्माण करणारे रसायन सापडली आहेत. कंपनीने यूएस बाजारातून Dove, Nexxus, Suave, TIGI आणि TRESemmé aerosol ड्राय शैम्पू परत मागवले आहेत.

 

Jawale Jewellers

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, त्यामध्ये बेंझिनची उपस्थिती आढळून आली आहे. या रसायनामुळे कर्करोग होऊ शकतो.  बेंझिनमुळे मानवांमध्ये कर्करोग होऊ शकतो. तसेच, बेंझिन मानवी शरीरात अनेक प्रकारे प्रवेश करू शकते. तो वासाने, तोंडातून आणि त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे रक्ताचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. याशिवाय, लोकांनी अशा उत्पादनांचा वापर करणे थांबवावे आणि त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी UnileverRecall.com च्या वेबसाइटला भेट द्यावी. युनिलिव्हरने अद्याप यावर कुठलेही भाष्य केलेले नाही.

Manganga

 

दरम्यान, यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननुसार (FDA) , ही उत्पादने ऑक्टोबर 2021 पूर्वी तयार करण्यात आली होती आणि देशभरातील किरकोळ विक्रेत्यांना वितरीत करण्यात आली होती. यामध्ये Dove Dry Shampoo Volume and Fullness, Dove Dry Shampoo Fresh Coconut, Nexxus Dry Shampoo Refreshing Mist आणि Suave Professionals Dry Shampoo Refresh and Revive यांचा समावेश आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.