Latest Marathi News

BREAKING NEWS

“मी कधीच कुणाला घाबरत नाही, म्हणून तर मुख्यमंत्रीपदापर्यंत….”: मुख्यमंत्री शिंदेचा ‘यांना’ टोला!

0 205

गडचिरोली: आधीच्या सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून यशस्वी कामगिरी बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोलीत आले आहेत. या ठिकाणी नक्षलवाद्यांशी दोन हात करणाऱ्या जवान आणि पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीत आले आहेत.

 

Jawale Jewellers

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मला भीती असती तर मी गडचिरोलीत आलोच नसतो. मी कधीच कुणाला घाबरलो नाही. परिस्थितीला तोंड देण्याचं काम केलं म्हणून तर मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले. त्यांनी नक्षलवाद्यांना इशारा देतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही नाव न घेता टोला लगावला

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.