Latest Marathi News

BREAKING NEWS

पुराव्याशिवाय नवऱ्याला दारूडा म्हणणे म्हणजे ……: मुंबई उच्च न्यायालय!

0 408

मुंबई : पुराव्याशिवाय पतीची बदनामी करणे, त्याला व्यभिचारी आणि मद्यपी म्हणणे म्हणजे क्रूरता होय, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे. यासह पुण्यातील एका दाम्पत्याचा कौटुंबिक न्यायालयाने केलेला घटस्फोट उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, पुण्यातील ५० वर्षांची महिला आणि तिचा नवरा यांच्यातील घटस्फोटाचा खटला पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात सुरू होता. या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाला मान्यता दिली. याविरोधात महिलेने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ही सुनावणी सुरू असतानाच पतीचे निधन झाले. त्यामुळे पतीचे वारस यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
महिलेने आपल्या अपीलमध्ये दावा केला की, तिचा नवरा व्यभिचारी आणि मद्यपी होता. या दुष्कृत्यांमुळे तिला तिच्या वैवाहिक हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले होते. पत्नीने पतीच्या चारित्र्यावर अन्यायकारक आणि खोटे आरोप करणे हे समाजातील तिच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवते आणि क्रूरता आहे असे खंडपीठाने म्हटले आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.