Latest Marathi News

BREAKING NEWS

अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला लैंगिक अत्याचार!

0 433

मुंबई: मुंबईच्या सीएसटी परिसरात २ नराधमांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलीला न्यायालयाच्या आदेशानंतर महिला आश्रम येथे ठेवण्यात आले. मानसिक स्थिती ठिक नसल्याने तिला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केले होते.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, पीडित मुलीला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र २१ आॅक्टोंबर रोजी ती रुग्णालयातून कुणालाही न सांगता निघून गेली होती. त्यानंतर ती सीएसटी स्थानक परिसरात पोहचली ही तिच्या जागेवरून न सांगता निघून गेली होती. ती फिरत फिरत सीएसटी स्थानक परिसरात पोहचली. सीएसटी स्थानक येथे सोनू व राजेंद्र नावाच्या दोन व्यक्ती तिला भेटले. तिची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे पाहून दोघांनी तिला तेथील एका लाॅजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

Manganga

 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडितेला वैदयकिय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.