नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता सहकारी बँकेच्या ग्राहकांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी सरकार सहकारी बँकांना डायरेक्ट बँक ट्रान्सफरशी जोडण्यात येणार आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.
अमित शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकिंग क्षेत्रात पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा झाली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळणार आहे.याशिवाय जन, धन योजनेमुळे 45 कोटी नवीन लोकांचे बँक खातेही उघडण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा फायदा थेट बँक ग्राहकांना मिळणार आहे. सरकारच्या नव्या निर्णयामुळे 32 कोटी लोकांना रुपे डेबिट कार्डचा लाभही मिळाला आहे.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामुळे ‘सहकार से समृद्धी का संकल्प’मुळेच हा लाभ झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

तसेच, कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना दोन टक्के सवलतही दिली जाते असेही त्यांनी सांगितले.