Latest Marathi News

BREAKING NEWS

गरोदर महिलांना ग्रहण पाळायची सक्ती करु नका: अंधश्रद्धा निर्मूलन समिती!

0 355

मुंबई: आज खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. या वेळी ३६ टक्के सूर्य झाकला जाणार आहे. ग्रहण हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वीच्या सावल्याचा खेळ असतो. मात्र, या ग्रहणात अनेक जण अंधश्रद्धेच्या आहारी जातात.

 

Jawale Jewellers

मात्र, या सुंदर खगोलीय घटनेला अशुभ न मानता गरोदर महिलांना ग्रहण पाळायची सक्ती करू नका, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आवाहन केले असून, ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण’ ही प्रबोधन मोहीमही सुरू केली आहे.

Manganga

 

दरम्यान, माहितीनुसार, ग्रहण काळात गरोदर मातेने काम केलेस बाळाचे ओठ फाटतात. याला काहीही वैद्यकीय आधार नाही. मानवी गर्भाचा विकास आठव्या आठवड्यापर्यंत पूर्ण झालेला असतो व त्यासाठी क्रोमोसोम्स व त्यावरील जनुके जबाबदार असतात. तिसऱ्या व पाचव्या महिन्यातील सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांना काही दोष दिसले नसल्यास काहीच घाबरण्याचे कारण नाही. ग्रहणामुळे बाळाला व्यंग निर्माण होत नसून वैज्ञानिक दृष्टिकोनातून गरोदर मातेला ग्रहण पाळायला लावू नका, असे आवाहन अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, सुकुमार मंडपे, प्रमोदिनी मंडपे, ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शैला दाभोलकर, डॉ. शंतनू अभ्यंकर, डॉ. दीपक माने, वंदना माने, हौसेराव धुमाळ यांनी केले आहे.(सौ. साम)

Leave A Reply

Your email address will not be published.