Latest Marathi News

BREAKING NEWS

आज जगात सूर्यग्रहण होणार ; जाणून घ्या सूर्यग्रहणाची वेळ!

0 557

नवी दिल्ली : आज 25 ऑक्टोबरला देशात आणि जगात सूर्यग्रहण होणार आहे. 2022 सालातील शेवटचे सूर्यग्रहणआहे. हे ग्रहण भारतातील काही शहरांमधून पाहता येणार आहे. हे ग्रहण म्हणजे दुर्मिळ खगोलीय घटना आहे. देशाच्या राजधानीसोबत हे ग्रहण जयपूर, कोलकाता, मुंबई, चेन्नई, नागपूर आणि द्वारका येथूनही दिसणार आहे.

 

Jawale Jewellers

ग्रहणकाळात भारतातील लोकांना फक्त 43 टक्के मंद सूर्यच दिसणार आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Manganga

 

तसेच, भारतातील वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:29 वाजता सुरू होणार आहे. हे ग्रहण सुमारे 04 तास 03 मिनिटे चालणार आहे. संध्याकाळी 6.32 वाजता ग्रहण संपणार आहे.

 

दरम्यान, सूर्य हा आपल्या कक्षेत फिरत असतो. मात्र, जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा आपण सूर्य पाहू शकत नाही. या खगोलीय स्थतीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा चंद्र सूर्याच्या काही किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतो तेव्हा त्याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात.अशा प्रकारचे सूर्यग्रहण भारतात 2 ऑगस्ट 2027 रोजी दिसणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.