Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, मंगळवार २५ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 756

मेष:
आर्थिक नियोजनावर विचार कराल. मानसिक चुळबुळ कमी करावी. खर्चात वाढ संभवते. काही गोष्टी शांत राहून बघत रहा. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो.

 

Jawale Jewellers

वृषभ:
आपली क्षमता लक्षात घ्यावी. नवीन काम अंगावर येऊ शकते. कामे उरकताना दमछाक होऊ शकते. विद्यार्थी वर्ग खुश असेल. दिवस बर्‍यापैकी व्यस्त राहील.

Manganga

 

मिथुन:
मन स्थिर ठेऊन विचार करावा. कामात सकारात्मक बदल संभवतात. चंचलतेवर मात करावी लागेल.नियोजनबद्ध कामे करा. एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका.

 

कर्क:
मुलांबाबत आत्मविश्वास वाढेल. आपल्या धाडसाचे फळ मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. कचेरीची कामे मार्गी लावाल. ग्रहमानाची साथ लाभेल.

 

सिंह:
अपेक्षित उत्तर हाती येईल. हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल. कामात अनुकूलता येईल. लहान प्रवास घडेल.

 

कन्या:
वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. मानसिक स्वास्थ्य जपावे. सहकारी वर्ग मदत करेल. इतरांना सढळ हाताने मदत कराल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल.

 

तूळ:
बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा. महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. हातातील काम यशस्वी होईल. संभ्रमित गोष्टी पुढे ढकलाव्यात. दिवस संमिश्र राहील.

 

वृश्चिक:
एखादा वाद संपुष्टात येईल. एखादी नवीन संधी चालून येईल. गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका. मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते.

 

धनू:
तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील. घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल.

 

मकर:
जुनी कामे आधी मार्गी लावावीत. अतिधाडस दाखवू नका. हातातील गोष्टी जपून ठेवा. मोठी खरेदी विचारपूर्वक करावी. जुगार खेळतांना सावध राहावे.

 

कुंभ:
घरगुती गैरसमज टाळावेत. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आपले स्पष्ट मत देताना विचार करा. फसवणुकीपासून सावध राहावे. बौद्धिक क्षमता वाढेल.

 

मीन:
जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. जवळचे मित्र भेटतील. काही खर्च अचानक सामोरे येतील. हातातील कामातून आनंद मिळेल. नातेवाईकांशी संपर्क होऊ शकेल.

Leave A Reply

Your email address will not be published.