Latest Marathi News

BREAKING NEWS

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन, त्यांनी अखेर उद्धव ठाकरेना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवलंच”

0 416

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. काल त्यांनी औरंगाबादचा दौरा करून शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. याच पार्श्वभूमीवर, माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

 

Jawale Jewellers

भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, “माजी मुख्यमंत्र्यांचा सर्वात गतीमान दौरा होता. इतक्या छोट्या काळात त्यांनी काय पाहणी केली हे कळत नाही. जेव्हा हे विरोधी पक्षात होते तेव्हा जी मागणी केली ती पु्न्हा केली आहे. जेव्हा मुख्यमंत्री होता त्यावेळी का शेतकऱ्यांना मदत केली नाही. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना किती मदत केली? ते तरी जाहीर करा, असे सांगतानाच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. त्यांनी उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांच्या बांधावर पुन्हा पाठवले. किमान त्या निमित्ताने ते मातोश्रीच्या बाहेर पडले, असा खोचक टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.