Latest Marathi News

BREAKING NEWS

“राज ठाकरेंची भाजप आणि शिंदे महायुतीमध्ये आवश्यकता नाही”: ‘या’ केंद्रीय मंत्र्यांचे मोठे वक्तव्य!

0 239

मुंबई : शिवतीर्थावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही एकाच मंचावर उपस्थित होते. यामुळे नवी युती पहायाला मिळेल अशी चर्चा रंगली होती. मात्र, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे सोबतच्या युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

 

Jawale Jewellers

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाला गेले असले तरी राज ठाकरे NDA मध्ये येणार नाहीत , आम्हाला तशी मनसेची आवश्यकता नाही आहे. मुंबई महापालिकेवर RPI, भाजप आणि शिंदे गटाचाच झेंडा फडकणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंची आमच्या महायुतीमध्ये आवश्यकता नाही असे रामदास आठवले म्हणाले.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.