लंडन: भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीने आज सायंकाळी 6.30 वाजता ऋषी सुनक यांची नेता म्हणून निवड केली आहे.
दरम्यान, सुनक, बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डंट हे पुढच्या ब्रिटीश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. जॉन्सन यांनी माघार घेतली आणि पेनी यांना आवश्यक पाठिंबा मिळू शकला नाही. शर्यतीतून बाहेर पडताच सुनक हे ब्रिटनचे पहिले आशियाई पंतप्रधान बनणार होते. ऋषी यांना पक्षातून प्रचंड पाठिंबा मिळाला आहे.