शिर्डी: उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत यांनी शिर्डींच्या साईंच्या चरणी १ कोटी ५१ लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. अनंत अंबानी हे दिपावलीच्या मुहूर्तावर साई चरणी नतमस्तक होण्यासाठी आले होते.
माहितीनुसार, साई संस्थानच्या मुख्या कार्यकारी अधिकारी भाग्याश्री बानायत यांनी अनंत अंबानी यांचे स्वागत केले. अंबानी हे साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित हाेते. यावेळी अनंत अंबानी यांनी साईंची मनोभावे पूजा अर्चा केली. त्यानंतर साईबाबा संस्थानच्या मुख्यब कार्यकारी अधिकारी भाग्यतश्री बानायत यांच्याकडे अनंत अंबानी यांनी एक कोटी ५१ लाख रुपयांची देणगी सुपुर्द केली.
दरम्यान, अंबानी यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या महिनाभरात दोनवेळा त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला होता.