इचलकरंजी: इंचलकरंजी शहरालगत यड्राव या गावातून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलेले आहे. यड्राव गावात असलेल्या शालीमार डेअरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून सुमारे १२८० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. सुमारे चार लाख दहा हजार रुपयांचे हे भेसळयुक्त पनीर पोलिसांनी जप्त केले.
दरम्यान, दूधामध्ये दूध पावडर आणि केमिकल ऑईल मिक्स करून पनीर तयार करण्यात येत होते. तर डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्यामुळे डेअरी सील करण्यात आली आहे.