पुरंदर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज पुरंदरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. तसेच, यावेळी शरद पवार यांनी मनसोक्त टोलेबाजी केली.
पुरंदरमध्ये शरद पवार यांनी एका शेतकरी कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. सभेपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं, समस्या ऐकून घेतल्या. यावेळी एका तरुण शेतकऱ्याने पवारांना या वयात बाहेर न फिरण्याची विनंती केली. आमची एक कळकळ आहे. साहेबांनी फिरू नये. एका जागेवरून रिमोट दाबावा. आम्ही जिथे असू तिथून काम करू, असं हा शेतकरी म्हणाला. त्यानंतर झालेल्या सभेत पवारांनी हाच धागा पकडून मिश्किल कोटी केली.
पवार म्हणाले, “आताच एक आमच्या भावकीतील जेजुरीच्या सहकाऱ्यांनी सांगितलं मी आता मी बाहेर फिरू नये. त्यांना वाटतं मी म्हातारा झालो. कुठायत ते? आहेत का? कुणी सांगितलं म्हातारा झालो? तुम्ही काय बघितलं? काय म्हातारा बितारा झालो नाही. ठिक आहे वय वाढतं, अशी मिश्किल टिप्पणी पवार यांनी करताच एकच खसखस पिकली.