Latest Marathi News

BREAKING NEWS

“झगमगती दिवाळी पहाट आहे, पैशांचा पाऊस पडतोय”: माजी महापौर किशोरी पेडणेकर

0 173

 

Jawale Jewellers

मुंबईः राज्यभरात दिवाळीनिमित्त उत्साही वातावरण असताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी आजच्या वरळीतील भाजपच्या कार्यक्रमाला टार्गेट केले. भाजपने आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातील जांभोरी मैदानावर दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला.यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

 

Manganga

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘ वरळीत अनेक ठिकाणी दिवाळी पहाट सुरु आहे. काही ठिकाणी झगमगती दिवाळी पहाट आहे. पैशांचा पाऊस पडतोय. वेगवेगळ्या माध्यमांतून हे सुरु आहे. पण विचार काय तर काहीच नाही…, बऱ्याचदा दोन पक्षांच्या कार्यक्रमांची तुलना केली जाते. पण जांभोरी मैदानावरची लोकं कंटाळली आहेत. प्रत्येक ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही, शिंदे गटातील वाचाळवीरांना दिवाळीच्या शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.