नंदुरबार : दिपोत्सेवानिमित्ताने व आजच्या लक्ष्मीमपुजनानिमित्ताने बाजारात झेंडूंच्या फुलांची मागणी अधिक वाढली आहे. आज सकाळपासून ५० ते ६० रूपये प्रतिकिलो दराने फुलांची विक्री होत आहे.
माहितीनुसार, दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन व वाहनांच्या पूजेसाठी झेंडू फुलांची मागणी वाढली असून झेंडू फुलांच्या दुकानांनी बाजारपेठा सजल्या आहे. तसेच शेतात लागवड केलेले शेतकरी बांधव झेंडू फुले विक्री करण्यासाठी थेट बाजारात दाखल झाले आहे. न लक्ष्मीपूजन तसेच वाहनांची पूजा करण्यासाठी भाविक झेंडू फुलांची खरेदी करताना दिसून येत आहे. यंदा झेंडू फुले 50 ते 60 रुपये दराने बाजारात विक्री होत आहे.
दरम्यान, ग्राहकांकडून ही चांगला प्रतिसाद मिळत असून दर समाधान कारक असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.