Latest Marathi News

BREAKING NEWS

कारगिल: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सैनिकांसोबत दिवाळी साजरी!

0 383

नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली आहे. पंतप्रधान मोदी आज, सोमवारी सकाळी कारगिलला पोहोचले. याठिकाणी त्यांनी सैनिकांची भेट घेतल्यानंतर संध्याकाळी ते दिवाळीच्या उत्सवात सामील होतील, असे सांगण्यात आले. पंतप्रधानांनी दिवाळीनिमित्त सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Jawale Jewellers

दरम्यान, पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी सतत देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. 2014 मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून ते सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसोबत दरवर्षी दिवाळी साजरी करतात. यावेळी त्यांची दिवाळी कारगिलमध्ये सैनिकांसोबत साजरी होणार आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.