Latest Marathi News

BREAKING NEWS

“पक्षात राहून ‘तुम्ही’ विरोधकांसाठी विरोधी पक्षनेते म्हणून काम करता”: प्रवीण दरेकर यांनी सांगितले जुने किस्से!

0 174

मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या वतीने दिवाळी पहाट मैफिलीचे आयोजन करण्यात आलं होतं. ‘प्रभाती सूर नभी रंगती’ हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. प्रभाती सूर नभी रंगती’ या कार्यक्रमात बोलताना अभिनेते मनोज जोशी यांनी दरेकर यांचा उल्लेख विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असा केला. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी जुने किस्से सांगितले.

 

Jawale Jewellers

प्रवीण दरेकर म्हणाले, “मी विरोधी पक्षनेता असताना केलेलं कार्य, दौरे आजही लोकांना आठवतात. त्यामुळेच मनोज जोशी यांनी विरोधी पक्षनेते असा माझा उल्लेख केला, असे ते म्हणाले. तसेच, पक्षात राहून तुम्ही विरोधकांसाठी विरोधी पक्षनेते म्हणून काम करता, असे देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात, असे म्हणत दरेकरांनी फडणवीसांसोबतचाही किस्सा सांगितला.

Manganga

 

दरम्यान, प्रवीण दरेकर यांच्या वतीने ‘प्रभाती सूर नभी रंगती’ दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी, अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे, मनोज जोशी, स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, अभिनेत्री हेमांगी कवी, श्रेया बुगडे, स्वाती देवल यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची उपस्थिती होते.

Leave A Reply

Your email address will not be published.