Latest Marathi News

BREAKING NEWS

“……तेव्हा आम्ही युतीत लढू”; मनसे-भाजप युतीवर मनसे आमदार राजू पाटील यांची मोठी प्रतिक्रिया!

0 224

कल्याण: सध्या राज्यात मनसे-भाजप युतीची  चर्चा सुरू असतानाच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे.

 

Jawale Jewellers

राजू पाटील म्हणाले, मागच्या सरकारने राज ठाकरेंचं ऐकून घेतलं नसेल. पण हे सरकार तसं वागत नाही, हे सरकार आम्ही दिलेल्या सूचना ऐकतं. त्यानुसार काम करतं. अशी कामे होत असताना जर जवळीक होत असेल तर त्यातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. परंतु जवळीक चांगली आहे. हे एक चांगलं रसायन दिसून येतं. एकमेकांना समजून घेत आहेत. कामे होत आहेत, असे त्यांनी वक्तव्य केले.

Manganga

 

तसेच ते पुढे म्हणाले, “आम्ही काही सत्तेत नाही. सत्तेत बसायच्या आधी आम्ही भाजपला मतदान केलं होतं. आम्ही सरकारला पाठिंबा दिलेला आहे. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. पण त्याकडे विशिष्ट चष्म्यातून पाहू नये. आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. पण ज्या दिवशी राज साहेब म्हणतील युतीत लढायचं, तेव्हा आम्ही युतीत लढू. राज साहेबांचा आदेश आमच्यासाठी शेवटचा आहे, असे त्यांनी भाष्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.