Latest Marathi News

BREAKING NEWS

फटाक्यांच्या स्फोटामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका:म्हणून ‘या’ कृती करा!

0 165

मुंबई: दिवाळी हा आनंदाचा सण. फटाके आणि मिठाई या सणाची उत्कंठा वाढवतात. पण या उत्साहात ज्यांना आधीच हृदयविकार किंवा न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्या आहेत त्यांनी अत्यंत सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.

 

Jawale Jewellers

आरोग्य तज्ज्ञांनुसार, फटाक्यांच्या स्फोटाच्या आवाजामुळे अशा आजारांना बळी पडणाऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. फटाक्यांच्या अचानक फुटण्याचा आवाज जरी ९० डेसिबलच्या खाली असला तरी अशा रुग्णांसाठी हानीकारक ठरू शकतो. फटाक्यांच्या स्फोटामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.

Manganga

 

यासाठी खालील कृती करा:

डॉक्टरांचे म्हणणे आहे, ज्या लोकांना आधीच हृदय-न्युरोलॉजिकल समस्या आहेत, त्यांना फटाक्यांच्या आवाजापासून वाचवणे आवश्यक आहे. संध्याकाळी घरात राहण्याचा प्रयत्न करा. बंद खोलीत राहिल्याने ध्वनी आणि प्रदूषण दोन्ही टाळता येते.
तसेच, हृदयाची औषधे नियमितपणे वेळेवर घ्या. दम लागणे किंवा छातीत दुखणे यासारखी लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

लहान मुले आणि हृदयाची पूर्वस्थिती असलेले लोक मोठ्या आवाजासाठी अधिक संवेदनशील असतात आणि त्यांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे.ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी आपले दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा. हृदयरोग्यांनी खाण्यापिण्याबाबत विशेष काळजी घ्यावी. कमी चरबीयुक्त, कमी साखर आणि कमी सोडियमयुक्त पदार्थच खा.

 

 

याशिवाय, जास्त आवाजाच्या फटाक्यांपासून दूर राहा.फटाक्यांचा मोठा आवाज टाळण्यासाठी आणि चांगली झोप घेण्यासाठी इअरप्लग घाला.

Leave A Reply

Your email address will not be published.