Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, सोमवार २४ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 675

 

Jawale Jewellers

मेष:
आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.आंधळा विश्वास ठेऊ नका. कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल.

 

Manganga

वृषभ:
प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे. दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. मैत्रित मतभेद आड आणू नका. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल.

 

मिथुन:
बदल समजून घेऊन कामात हात घाला. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. वैचारिक स्थैर्य बाळगा. काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल.

 

कर्क:
व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. भावंडांना मदत कराल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका.

 

सिंह:
लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामानिमित्त प्रवास घडेल. विरोधक माघार घेतील. हातातील अधिकारचे बळ दाखवा. हातापायला किरकोळ इजा संभवते.

 

कन्या:
आवडी-निवडी कडे अधिक लक्ष द्याल. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये. आहाराची पथ्ये पाळावीत. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. वादाचे प्रसंग टाळावेत.

 

तूळ:
व्यावसायिक योजनावर विचार कराल. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. अचानक धनलाभ संभवतो.

 

वृश्चिक:
मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल. काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात. काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. वरिष्ठांच्या मतानेच चालावे. झोपेची तक्रार जाणवेल.

 

धनू:
कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. हातातील संधी सोडू नका. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांना मदत कराल.

 

मकर:
वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. मनातील साशंकता दूर करावी. धार्मिक गोष्टीत मन रमेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल.

 

कुंभ:
तिखट शब्दांचा वापर टाळावा. घरगुती वातावरण उत्तम राहील. घाईने निर्णय घेऊ नयेत. कौटुंबिक कामात आनंद मानाल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी.

 

मीन:
अडचणीतील लोकांना मदत कराल. सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे. धैर्य व संयम आवश्यक. आततायीपणा करू नका. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका.

 

Leave A Reply

Your email address will not be published.