Latest Marathi News

BREAKING NEWS

टी20 वर्ल्डकप 2022: आक्रमक खेळी करत भारताचा जोरदार विजय!

0 353

नवी दिल्ली: नवी दिल्ली : टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची दाणादाणा उडवली. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं ऐतिहासिक आक्रमक खेळी करून क्रिकेटविश्वात तो रनमशीन असल्याचं पुन्हा सिद्ध केलं. पाकिस्तानने भारताला 160 धावांचं आव्हान दिलं होतं. पंरतु, विराट कोहलीनं पुन्हा एकदा चमत्कार करून 53 चेंडूत नाबाद 82 धावांची आक्रमक खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.

 

Jawale Jewellers

पाकिस्तानचा फिरकीपटू मोहम्मद नवाझचा बाराव्या षटकात विराट कोहली आणि पंड्याने धुव्वा उडवला. तीन षटकार ठोकून वीस धावांची खेळी भारतीय फंलदाजांनी केली. त्यामुळं अठराव्या षटकानंतर भारताची धावसंख्या चार बाद 131 वर पोहोचली आहे. विराट-हार्दिकची सावध खेळी केली. 19 षटकानंतर भारताची धावसंख्या 144-5 अशी होती. त्यानंतर विराटने षटकार मारून आक्रमक खेळी करत भारतला विजय मिळवून दिला.

Manganga

 

दरम्यान, विराट कोहलीने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत 53 चेंडूत 82 धावांची नाबाद आक्रमक खेळी केली. या इनिंगमध्ये विराटने सहा चौकार आणि चार षटकार ठोकले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.