Latest Marathi News

BREAKING NEWS

राजेवाडीच्या सद्गुरु साखर कारखान्यावर स्वाभिमानीची धडक : कार्यकर्ते पोलिसात धुमचक्री : अन्यथा कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही : महेश खराडे

0 1,547

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील सद्गुरु साखर कारखान्यावर, गतवर्षीचे २२३ रुपये तातडीने द्यावेत, चालू वर्षाची एफआरपी एकरकमी जाहीर करावी यासह अन्य मागण्यासाठी कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धूमचक्री झाली. मागण्या मान्य न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी कारखाना प्रशनास दिला.

Jawale Jewellers

मोर्च्यामध्ये तालुकाध्यक्ष विजय माने, तानाजी सागर, विठ्ठल मोरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, सचिन पाटील, अजित बोरकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेवाडीच्या मुख्य चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. एकच गट्टी राजू शेट्टी, ऊस बिल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक रकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत मोर्चा कारखाना गेट वर आला. त्या ठिकाणी मोर्चा पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्याच्या मध्ये जोरदार धुमचक्री झाली.

Manganga

यावेळी शेतकऱ्यांनी गेटवर च ठिय्या मारला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. आंदोलकां समोर बोलताना जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले. गतवर्षी कारखान्याने २६६० रुपये देण्याचे जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात २४३७ रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना बिले दिली. अद्याप २२३ रुपये बाकी आहेत. ती रक्कम तातडीने द्यावी. त्याचबरोबर एक रकमी एफआरपी जाहीर करावी. वजनातील काटामारी थांबवावी, तोडायला द्याव्या लागणाऱ्या पैसे बंद करावे. जर मजुरांना पैसे द्यावे लागत असतील तर कारखान्याने तोडणीचे पैसे कपात करू नयेत. रिकव्हरी चोरी थांबवावी, वजनकाटा आणि रिकव्हरी लॅब ऑनलाईन करावीत. या मागण्या मान्य न झाल्यास धुरडे पेटू देणार नाही असा इशारा दिला.

कारखान्याचे उपाध्यक्ष कर्णवर-पाटील यांनी आंदोलनस्थळी आले. त्यांनी आमचा काटा व्यवस्थित असून शेतकऱ्यांनी कुठेही वजन करून आणावे आमची कोणतीही हरकत असणार नाही अशी ग्वाही दिली. गतवर्षी चे २२३ रुपये तसेच या वर्षीची एक रकमी एफआरपी बाबत संचालक मंडळाशी चर्चा करून निर्णय घेवू असे सांगितले. त्याच बरोबर तोडायला द्याव्या लागणाऱ्या पैशा बाबत ही योग्य निर्णय घेवू तोडणीचे पैसे मुकादम घेणार नाहीत अशी व्यवस्था करू अशी ग्वाही दिली. यावेळी नंदकुमार माने, ईश्वर माने, संदीप शिरोटे, सागर शिरोटे, सुरेश पाचोब्रे, अजित कोडग, शिवराज गायकवाड, मदन जाधव, दत्ता भोसले आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.