खेड :कोकणातील मनसेचे नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे गणेशोत्सव काळातील लॉटरी प्रकरणात गोत्यात आले होते. आता याच प्रकरणात त्यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
माहितीनुसार, गणेशोत्सवातील लॉटरी या प्रकरणात खेडेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने कालच अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. यानंतर आज, समाज कल्याण विभागाचे रत्नागिरीच्या सहायक आयुक्तांनी खेडेकर यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे.

दरम्यान, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांच्या तक्रारीनुसार खेड पोलीस ठाण्यात खेडेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे खेडेकर यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.