Latest Marathi News

BREAKING NEWS

‘राष्ट्रवादीला फोडण्याच्या’ पडळकर यांच्या वक्तव्याला रोहित पवार यांचे मोठे प्रत्युत्तर!

0 661

 

सांगली: शिवसेना फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीला फोडण्याच्या पडळकर यांच्या विधानाला राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

Manganga

रोहित पवार म्हणाले, गोपीचंद पडळकर यांच्या या विधानावर शिवसेना मोठा पक्ष होता. त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून हा पक्ष फोडला. त्यांचं दुसरं टार्गेट राष्ट्रवादी असू शकते असं मी बोललो होतो, राष्ट्रवादी फोडणं सोप्पं नाही. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना यश येणार नाही. पण त्यांना लोकशाही माहीत नाही. ठोकशाही माहीत आहे. त्यामुळे त्यांचं दुसरं लक्ष्य कदाचित राष्ट्रवादी असेल, असे रोहित पवार यी वक्तव्य केले.

 

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथील एका सभेला संबोधित करत भाजपचा झेंडा आज राष्ट्रवादीच्या कार्यालयावर लागतो. मी विश्वासाने सांगतो हाच भाजपचा झेंडा येत्या काही काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावर दिसेल, असे वक्तव्य केले होते.याच त्यांच्या वक्तव्याला रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!