सोलापूर : मुंबईत कालच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे एकत्र आले होते. भविष्यात मनसेबरोबर युती होईल का? यावर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी वक्तव्य केले.
आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे मनसेबरोबर युती होण्याला काहीही अडचण नाही. कारण या तिन्ही पक्षांचा अजेंडा हा एकच आहे. पाया हा हिंदुत्वाचा आहे. त्यामुळं या तिन्ही पक्षांना एकत्र येण्यासाठी राजकारणाची कोणतीही अडचण वाटत नाही.

तसेच, बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि आनंद दिघे साहेबांचे हिंदुत्वाविषयीचे विचार एकनाथ शिंदे पुढं नेत आहेत. आम्ही शिंदे साहेबांचे सैनिक आहोत. बाळासाहेबांचा विचार खेड्यापाड्यात पोहचवतील, अशा विश्वास आहे, असे वक्तव्य आमदार शहाजी पाटील यांनी केले.