Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शनिवार २२ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 647

मेष:
आजचा दिवस शुभ आहे. कामात घाई गडबड करू नका. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल. दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल.

 

वृषभ:
करमणुकीकडे कल वाढेल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल. हातातील कामात यश येईल. घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल.

Manganga

 

मिथुन:
घरातील वातावरण प्रसन्न राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. कामातील अपेक्षितता वाढेल.

 

कर्क:
व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. सारासार विचार करावा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. धनवृद्धीचे योग जुळून येतील.

 

सिंह:
बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जुनी कामे विनासायास पूर्ण होतील.

 

कन्या:
काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील. मानसिक शांतता लाभेल. विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. खर्च समाधानकारक असेल.

 

तूळ:
मित्राचा सल्ला घ्याल. मत मांडताना थोडासा विचार करावा. जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते.

 

वृश्चिक:
रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. झोपेची तक्रार जाणवेल. बोलताना तारतम्य बाळगवे लागेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

 

धनू:
भावंडांशी स्नेहभाव वाढेल. आनंदाची अनुभूति घ्याल. सांसारिक सौख्यात वाढ होईल. मानसिक शांतता लाभेल. घरासाठी खरेदी केली जाईल.

 

मकर:
फार गरज नसेल तर प्रवास टाळावा. वाहन विषयक कामे निघतील. अचानक उद्भवणार्‍या खर्चावर आळा घालावा. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. गोड बोलून कामे करून घ्याल.

 

कुंभ:
बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे. अचानक खर्चात भर पडू शकते. जुने प्रश्न मार्गी लावाल. किरकोळ समस्या सोडवू शकाल.

 

मीन:
कामातील उत्साह वाढेल. तणाव दूर होऊ शकेल. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. उगाच रागराग करू नका.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!