मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव आणि राणे कुटुंबीय यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. या दोघांमध्ये आरोप प्रत्योराप सुरु असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी भास्कर जाधवांवर हल्लाबोल केला आहे.
आमदार प्रसाद लाड म्हणाले, ‘मी भास्कर जाधव यांचं भाषण ऐकलं. ते खूप नाटक करतात, भास्कर जाधव यांचे नाव आयटम गर्ल ठेवुया, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालावा म्हणून एक आयटम साँग असते. अगदी तशाच प्रकारे उद्धव ठाकरेंचे भास्कर जाधव हे आयटम गर्ल आहेत’, असे वादग्रस्त विधान प्रसाद लाड यांनी केले.

दरम्यान, संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून बोलताना प्रसाद लाड यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला.