Latest Marathi News

‘या’ गैरव्यवहार प्रकरणामुळे एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार!

0 168

पुणे :विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे आता पुन्हा अडचणीत येणार असल्याची माहिती समोर येत आहे. भोसरीतील जमीन एमआयडीसीच्या मालकीची आहे, असा दावा पुण्यातील बांधकाम व्यवसायिक हेमंत गावडे यांनी केला आहे. या जागेची किंमत तीस कोटीहून अधिक असताना खडसेंनी ती पावने चार कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर ५२ मधील तीन एकर जागा 2016 मध्ये एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून तीन कोटी पंचाहत्तर लाख रुपयांना खरेदी केली . पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टॅम्प ड्युटी म्हणून 1 कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले.परंतु,ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचा आरोप पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी केला आहे.

Manganga

 

तसंच या जागेची किंमत तीस कोटीहून अधिक असताना खडसेंनी ती पावने चार कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही जागा अब्बास उकानी यांची आहे की एम आय डी सी च्या मालकीची आहे याबद्दल न्यायालयात खटला सुरु असतानाच खडसेंनी ही जागा उकानी यांच्याकडून विकत घेतली होती.हेमंत गावंडे यांच्या तक्रारीवरून न्यायालयाने एकनाथ खडसे ,त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई यांच्याविरुद्ध 2017 मधे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

 

एकनाथ खडसेंना या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. मात्र, 2018 मध्ये या प्रकरणाचा तपास करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणात खडसेंना क्लिन चीट देत न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यानंतर एकनाथ खडसेंनी ऑक्टोबर 2020 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर भोसरी एमआयडीसी प्रकरण ईडीकडे सोपवण्यात आले आणि इडीने तपासाला सुरुवात केली.खडसेंचे जावई गिरीष चौधरी यांना या प्रकरणात इडीने अटक केली .

 

खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना इडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले .या प्रकरणाचा इडीकडून तपास सुरुच आहे.फेब्रुवारी 2022 मध्ये एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध हेमंत गावंडे यांनी पुन्हा न्यायालयात याचिका दाखल केली आणि चौकशीची मागणी केली. याप्रकरणी न्यायालयात पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.(सौ. साम)

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!