आटपाडी : आटपाडी शहरातील ओढा पात्राचे संवर्धन व सुशोभीकरणासाठी आम. गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांच्याकडे सहा कोटी रुपयांची मागणी
आटपाडी : आटपाडी शहरातुन वाहणाऱ्या ओढा पात्राचे संवर्धन व सुशोभीकरणासाठी आम. गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांच्याकडे सहा कोटी रुपयांची मागणी केली असून याबाबत त्यांना मुंबई मंत्रालय येथे निवेदन दिले आहे.
आटपाडी नगरपंचायतीची स्थापना २०/५/२०२२ रोजी झाली आहे. तर आटपाडी शहराची लोकसंख्या २३ हजार इतकी आहे. सध्या आटपाडी शहरामधून वाहणाऱ्या ओढ्याची अवस्था खूप वाईट झाली आहे. शहराती सांडपाणी हे ओढा पात्रात मिसळत असते.

तसेच अनेक ठिकाणी ओढा पात्रात राडारोडा पडलेला आहे. त्यामुळे ओढ्याला नाल्याचे स्वरूप आले असून ओढ्याचे नैसर्गिक रूप हरवले आहे. त्यामुळे ओढ्याचे संवर्धन व सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. सदर ओढ्याचे संवर्धन व सुशोभीकरण करणे आवश्यक असून यामुळे अस्वच्छता काही प्रमाणत कमी होणार आहे. तसेच शहरातील नागरिकांना फिरण्यासाठी पर्यटन मिळणार आहे. त्यामुळे ओढा पात्राचे संवर्धन व सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वैशिट्यपूर्ण योजनेमधून सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आम. गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.