आटपाडी : येथील कलाश्री कॉम्पलेक्स येथे सावता माळी पावभाजी सेंटरचे उद्घाटन स्टेट बँक इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले.
आटपाडी तहसील कार्यालयासमोर कलाश्री कॉम्पलेक्स येथे दाजी माळी (आंबेबनमळा) यांचे संत सावता माळी हॉटेल आहे. याच ठिकाणी आता ग्राहकांना पावभाजी उपलब्ध असणार आहे. सदर पावभाजी सेंटरचे उद्घाटन स्टेट बँक इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष लांडगे यांनी केले.

यावेळी हॉटेल मालक दाजी माळी, कलाश्री डिजिटलचे हर्षवर्धन लांडगे, देशमुखवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रकाश देशमुख, चंद्रवर्धन लांडगे, तानाजी गळवे, सेवानिवृत्त पोस्टमास्तर जनार्धन करांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.