नवी दिल्ली : 22 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी देशातील 75,000 तरुणांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोकरीचे प्रमाणपत्र देणार आहेत. तसेच 10 लाख नोकऱ्या देण्यासाठी रोजगार मेळा सुरू करणार आहे.
पंतप्रधानांच्या सूचनेनुसार, सर्व मंत्रालये आणि विभाग त्यांची रिक्त पदे भरण्यासाठी काम करतील. या रोजगार मेळाव्यात देशातील 38 मंत्रालयांमध्ये ग्रुप ए, बी आणि सी पदांवर भरती केली जाणार आहे. तसेच, देशातील विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमधील लोक या रोजगार मेळाव्यात सामील होतील. या विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. येत्या 22 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ होणार आहेत. या जॉब फेअरमध्ये, सेंट्रल आर्म्ड फोर्सेस कार्मिक सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनो, पीए, इन्कम टॅक्स ऑफिसर आणि मल्टी टास्क स्टाफ या पदांसाठी भरती होईल.

याशिवाय, भरती प्रक्रिया UPSC, SSC आणि रेल्वे भर्ती बोर्ड यांसारख्या एजन्सीद्वारे केली जाईल. संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, श्रम आणि रोजगार मंत्रालय, पोस्ट विभाग, सीबीआय, सीमाशुल्क, बँकिंग आणि विविध सुरक्षा दलांमध्ये भरती केली जाऊ शकते.(सौ. साम)