जळगाव: खेडगाव (ता.चाळीसगाव) येथे तिन्ही मुलीच झाल्या मुलगा होत नाही; या कारणावरून सासऱ्याने केलेल्या छळाला कंटाळून विवाहीतेने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, खेडगाव (ता. चाळीसगाव) येथील सासर असलेल्या विद्या रविंद्र भील या विवाहीतेला तिनही मुलीच झाल्या. मुलगा होत नाही या कारणावरून सासरा तुकाराम रतन भिल हा दारू पिवून गेल्या 3 ते 4 वर्षांपासून विद्या हीस नेहमी वाईट शिवीगाळ तसेच मारहाण करून छळ करीत होता. ह्या सर्व त्रासाला कंटाळून विद्याने बुधवारी (19 ऑक्टोंनबर) सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास खेडगाव येथे तिच्या राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, याप्रकरणी अशोक दयाराम भील (रा. पांढरद, ता.भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विद्या हीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिचा सासरा तुकाराम रतन भील (रा.खेडगाव) याच्या विरोधात मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.