मुंबई :दिवाळीच्या तोंडावर मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त केला.
सणासुदीच्या काळात गोड पदार्थ आणि खाद्यतेलात भेसळ होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

तसेच, मुंबईत अन्न आणि औषध प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेत १ कोटी ४ लाख १४ हजार ११ रुपयांचे भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. १९ सप्टेंबर रोजी FDA ने राबवलेल्या विशेष मोहिमेत पेढ्यातील अन्नपदार्थाचे नमुने घेण्यात आले होते.