मुंबई : दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. 964 कोटी 15 लाख रुपयांची ही कर्जमाफी असणार आहे. भूविकास बँकेची मालमत्ता सरकारकडे हस्तांतरण केली जाणार आहे.
याशिवाय राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय सामाजिक आंदोलनातील गुन्हे आता मागे घेतले जाणार आहेत. 30 जून 2022 पर्यतचे सर्व गुन्हे घेणार मागे घेण्यात येणार आहेत.
