मुंबई:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता याच गौरी भिडे यांच्या जीवाला धोका असल्याचा सूचक इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. आमदार नितेश राणे यांनी याबाबत एक सूचक ट्विट केले आहे.

नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “गौरी भिडे यांच्या जीवाचे रक्षण होणे महत्त्वाचे असून त्यांना महाराष्ट्र शासनाने संरक्षण देण्याची गरज आहे. दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत आणि मनसुख हिरेन यांच्याबाबत काय झाले ते आम्हाला माहिती आहे.” असे सूचक ट्वीट करत त्यांनी गौरी भिडे यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.