रायगड: रायगडमध्ये राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि. कंपनीमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींवर आरसीएफ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
माहितीनुसार, टेरिझो ग्लोबल या कंपनीच्या ठेकेदारांना एसी सप्लाय व इन्स्टॉलेशनचे काम देण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी एसी इन्स्टॉल करत असताना हा भीषण स्फोट झाला. यामध्ये ठेकेदार कंपनीच्या तिघा जणांचा मृत्यू झाला तर तीन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना आरसीएफ रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे आरसीएफच्या अधिकार्यांनी सांगितले.

दरम्यान, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. रायगड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे हे दाखल घटनास्थळी दाखल झाले आहेत.