मुंबई : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बारामती अँग्रो लिमिटेडच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या चौकशीची मागणी करण्यात आली. भाजप आमदार राम शिंदे यांनी ही मागणी केली आहे.
तसेच, आमदार राम शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी रोहित पवार यांच्या बारामती अँग्रो लिमिटेडच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.

दरम्यान, आता रोहित पवार यांच्या बारामती अँग्रो लिमिटेड कारखान्याची उच्चस्तरीय चौकशी होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.