चिपळूण: आमदार भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्यात भाजपचा हात आहे असा दावा करत शिवसैनिक चिपळूण पाेलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी आमदार जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी शिवसैनिकांच्यावतीने मागणी केली.
यावेळी शिवसैनिकांनी जोपर्यंत भास्कर जाधव यांच्या परिवाराला सुरक्षा मिळत नाही व जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नसल्याचा पावित्रा घेतला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी देखील राणे यांच्यामुळे कायदा व सुवव्यस्था बिघडत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, सध्या सर्व शिवसैनिक पाेलिस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत.