Latest Marathi News

BREAKING NEWS

सावधान! ऐन दिवाळीत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात प्रवेश!

0 370

मुंबई: आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने राज्यात प्रवेश केला आहे. मुंबईत गेल्या तीन दिवसात कोरोनाचे 150 रुग्ण सापडले आहेत. गेल्या पाच दिवसात सरासरी दहा लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. शुक्रवारी राज्यात 477 रुग्ण सापडले. त्यातील 178 रुग्ण मुंबईतील होते. महाराष्ट्रात कोव्हिडचा बी बी सब-व्हेरिएंट (XBB sub variant)चाही रुग्ण सापडला आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. दिवाळीच्या गर्दीमुळे दिवाळी आधी आणि नंतर कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 

ऑमिक्रॉन स्पॉन नावाचा एक नवीन व्हेरिएंट आहे. तांत्रिकदृष्ट्या बीए 5.1.7 आणि बीएफ 7 नाव असे त्याला देण्यात आले आहे. हा व्हेरिएंट पहिल्यांदा चीनच्या मंगोलियात आढळला. गेल्या दोन आठवड्यात अमेरिकेत हा व्हेरिएंट 0.8 ते 1.7 टक्क्यांनी वाढला आहे. यूके, जर्मनी आणि फ्रान्स सारख्या यूरोपीय देशात या व्हेरिएंटची जवळपास 15 ते 25 टक्के प्रकरणं दिसून आली आहेत, अशी माहिती फरिदाबादच्या डॉक्टर चारु दत्त आरोडा यांनी दिली.

Manganga

 

 

दरम्यान, या व्हेरिएंटची लक्षणेही कोव्हिड 19 सारखी आहेत. अंगदुखी हे या व्हेरिएंटचे मुख्य लक्षण आहे. त्याशिवाय खोकला, सर्दी या नव्या व्हेरिएंटचे सब लक्षणे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!