मुंबई: शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घराबाहेरील आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने यांच्या घरावर मंगळवारी रात्री हल्ल्याचा प्रयत्न होता की काय अशी शंका आज (बुधवार) सकाळच्या सुमारास उपस्थित झाली आहे.
माहितीनुसार, माजी खासदार निलेश राणे यांनी चिपळूण येथे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांची नक्कल केली हाेती. यावेळी जाधव यांच्यावर टीका केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील मेळाव्यात या टीकेला उत्तर देताना राणेंसह भाजपावर टीका केली होती.

दरम्यान, आमदार भास्कर जाधव यांची सुरक्षा व्यवस्था काढल्याची माहिती समोर येत आहे. अचानक सुरक्षा व्यवस्था काढण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.