Latest Marathi News

व्हिडीओ : “ओ भास्करशेठ माझ्या नादी लागू नका,” चित्रा वाघ संतापल्या…!

0 373

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपच्या चित्रा वाघ यांची भर सभेमध्ये नक्कल केल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. भास्कर जाधव यांनी चित्रा वाघ यांना मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भातील पूजा चव्हाण प्रकरणावरुन टोला लगावला आहे. कुडाळ येथील झालेल्या जाहीर सभेमध्ये भाषण करताना त्यांनी चित्रा वाघ यांची नक्कल केली. यामुळे चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्वीट केला असून भास्कर जाधव यांच्या समाचार घेतला आहे.

भास्कर जाधवांनी काय टीका केली आहे?
संजय राठोड यांना लक्ष्य करताना जाधव यांनी चित्रा वाघ सध्या कुठे आहेत? असा खोचक प्रश्न विचारला. “त्या मुलीचा ज्या पद्धतीनं छळ झाला, ज्या पद्धतीनं तिनं आत्महत्या केली, त्या आत्महत्येच्या पाठीमागे संजय राठोडच आहेत अशापद्धतीने भाजपाने महाराष्ट्रात आरोपाची राळ उठवली,” असं जाधव यांनी म्हटलं. पुढे बोलताना त्यांनी चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरुन पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदांचा उल्लेख करत नक्कल केली.

 

काय म्हणाल्या आहेत चित्रा वाघ?
“ओ, भास्करशेठ तुम्ही आधी आणि आताही नाच्या’चं चांगल काम करता, तेच करा. माझ्या नादी लागू नका. जेव्हा पूजा चव्हाणसाठी मी लढत होती तेव्हा बिळात घुसला होतात की तोंडाला लकवा मारला होता? तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नव्हे तर आम्ही आमच्या जीवावर लढतो..याद राखा,” अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी भास्कर जाधव यांना सुनावलं आहे.

 

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!