Latest Marathi News

पीएम मोदींवर आत्मघाती हल्ला करण्याचा कट: गुप्तचर यंत्रणा!

0 332

नवी दिल्ली: गुप्तचर यंत्रणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत मोठा अलर्ट जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या निशाण्यावर आहेत. मोदींवर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या कागदपत्रांवरून समोर आले आहे.

 

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने लष्करला भारतातील सर्व बड्या नेत्यांना आपल्या निशाण्यावर घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सर्वात मोठे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आहे. पोलिसांच्या गणवेशातील हे दहशतवादी पीएम मोदींवर आत्मघाती हल्ला करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. गुप्तचर संस्थेने लष्कर-ए-तैयबाचे संभाषण रेकॉर्ड केले आहे, त्यानंतरच ही माहिती समोर आली आहे. या अलर्टनंतर पंतप्रधान मोदींची सुरक्षा वाढू शकते असे मानले जात आहे.

Manganga

 

दरम्यान, पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना मोदींवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा, इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!