Latest Marathi News

BREAKING NEWS

“स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं वाटोळं केलं”!

0 154

पुणे:पुणे शहराला काल रात्री 9 वाजेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला होता. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कालच्या पावसानंतर पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे.

 

पवार म्हणाले, “स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून भाजपने पुणे शहराचे पार वाटोळे करून ठेवले आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील, तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करतो. सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!