मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी सुनावणी आज पार पडली. यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आले. पुढील सुनावणी आता 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.

संजय राऊत यांच्या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या केसचं उदाहरण राऊत यांच्या वकीलांतर्फे कोर्टात देण्यात आलं आहे. आमच्या सर्व व्यवहारातील हेतू स्पष्ट होते. आम्ही काहीही लपवलं नाही. अनिल देशमुख यांच्यावरही आर्थिक गैरव्यवहाराचे 3 आरोप केले गेले होते. तसेच आरोप संजय राऊत यांच्यावर केले आहेत. हे दोन्ही खटले बऱ्याच प्रमाणात सारखेच आहेत. त्यांच्यावरही संस्थांमधून पैसे फिरवल्याचे आरोप केले आहेत. जर सर्व व्यवहार कागदावर आहेत, तर लपवल्याचे खोटे आरोप का? असा प्रश्न संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरंगी यांनी कोर्टात उपस्थित केला.
दरम्यान, अशाप्रकारे संजय राऊत यांना जामीन मिळावा याकरिता राऊत यांच्या वकिलांनी अनिल देशमुख यांच्या केसचा आधार घेतला आहे.